मुंबई – शक्ती मिल गँगरेपप्रकरणातील तडीपार आरोपी आकाश जाधव उर्फ गोट्यावर चाकूने हल्ला करण्यात आला आहे. त्याच्यावर नायर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून अधिक तपास सुरु आहे. आकाशावर झालेल्या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्या पोटावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून अद्याप आरोपी फरार आहे.
३१ जुलै २०१३ साली महालक्ष्मी येथे झालेल्या शक्ती मिल गँगरेपप्रकरणी आकाश जाधव उर्फ गोट्या या अल्पवयीन आरोपीला न्यायालायने ३ वर्षांची शिक्षा सुनावली होती. मात्र,गंभीर गुन्ह्यात शिक्षा भोगून आल्यानंतरही त्याच्या वागणुकीत तसूभरही बदल आढळून आला नाही. त्यानंतरही अनेक गुन्हे त्याच्याविरोधात दाखल होत असल्याने पोलिसांनी त्याच्यावर तडीपारची कारवाई केली. मात्र तडीपार असताना देखील परिसरात येऊन दादागिरी करणाऱ्या आकाशावर सोमवारी एका गटाने चाकू हल्ला केला. या हल्ल्यात त्याच्या पोटाला गंभीर दुखापत झाली असून त्यावर शस्त्रक्रिया पार पडली. याप्रकरणी आग्रीपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.