धुळे । शहरातील नटराज टॉकीज परिसरात असलेल्या ओम शांती कॉम्प्लेक्समध्ये काल रात्री चोरट्यांनी धाडसी चोरी केली. एका टायपिंग सेंटरचे शटर उचकवून आतील लॅपटॉपसह साहित्य चोरून नेले. आज सकाळी हा प्रकार उघडकीस आला असून माहिती मिळताच आझाद नगर पोलिसांसह ठसे तज्ज्ञ आणि श्वानपथकाने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी श्वानाने ऐंशी फूटी रोडपर्यंत मागही काढला. मात्र पुढे ते अपयशी ठरले.
सीसीटिव्ही नसल्याने चोरट्यांचे फावले
शहरातील सर्वच व्यापारी संकुलात सीसीटिव्ही लावणे सक्तीचे असले तरी अनेक ठिकाणी आजही सीसीटिव्ही लावण्यात आलेले नाहीत. दहा बाय पंधराच्या गाळ्याचे लाखो रुपये मोजून घेणार्या बिल्डरसह गाळे घेणारेही याबाबत फारसे गांभीर्य दाखवित नसल्याने चोरट्यांचे फावत आहे. याठिकाणी सीसीटिव्ही असते तर चोरट्यांची चोरी करण्याची हिंमत झाली नसती, अशी प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांमधून यावेळी व्यक्त होत होती. या परिसरात एका राजकीय कार्यकर्त्याच्या बंगल्यावर लावलेल्या सीसीटिव्ही कॅमेर्यात चोरटे अस्पष्ट कैद झाल्याचे सांगितले जात आहे. त्यातून पोलिसांना तपासात मदत होणार आहे.
आझादनगर पो.स्टे.त तक्रार
पारधी पिकेट पोलीस चौकी परिसरात रहणार्या अभिजीत श्रीकांत बनसोड यांच्या मालकीचे ओम शांती कॉम्प्लेम्समध्ये कॉर्नर टायपिंग इन्स्टिट्युट नावाचे टायपिंग सेंटर आहे. काल रात्री अभिजीत नेहमीप्रमाणे हे सेंटर बंद करून घरी गेले. मात्र आज सकाळी परिसरातील नागरिकांनी त्याच्या सेंटरमध्ये चोरी झाल्याची माहिती दिली. अभिजीत वडीलांसह तात्काळ सेंटरवर दाखल झाला. तसेच या चोरीची खबर आझादनगर पोलिसांना दिली. घटनास्थळी पहाणी केली असता चोरट्यांनी शटर तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र शटरमधील लोखंडी रॉड त्यांना तोडता न आल्याने ते वाकवून त्यांनी आत प्रवेश केला. आतमध्ये 9 लॅपटॉपसह 9 सीपीयु आणि अन्य साहित्य चोरट्यांनी चोरून नेले. त्याची किंमत लाखोंच्या घरात आहे. दरम्यान, माहिती मिळताच आझादनगरचे उप निरिक्षक नागलोतकर हे सहकार्यांसह घटनास्थळी दाखल झाले. शिवाय त्यांनी श्वान पथकासह ठसे तज्ज्ञांनाही खबर दिल्याने तेही त्या ठिकाणी दाखल झाले. यावेळी श्वानाने ऐंशी फूटी रोडपर्यंत माग काढला. तर ठसे तज्ज्ञांनाही त्याठिकाणी चोरट्याच्या हाताचे ठसे सापडले आहेत.
इतरही ठिकाणी चोरी
मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरातील दहा ते 12 हजारांची रोकड, दोन तोळे सोने,पैठणी साडी असा ऐवज लंपास केला. वीज गेलेली असल्याने घरात अंधार होता. किंमती वस्तु शोधण्यासाठी चोरट्यांनी घरात कागदे जाळून उजेड निर्माण केला होता. समृध्द नगरातच प्लॉट नं.6 मध्ये राहणार्या सचिन शेवतकर या भाजपा जिल्हाउपाध्यक्षाचे (क्रिडा सेल) यांचे घर चोरट्यांनी फोडले. घरात चोरट्यांनी प्रवेश केला.मात्र चोरट्यांच्या हाती फार काही लागले नाही. किरकोळ वस्तु शेवतकर यांच्या घरातुन चोरीला गेल्या आहे. मात्र शेवतकर यांच्या घर परिसरात)सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने चोरटे त्यात कैद झाले आहे. नकाणे रोडलाच लेखा नगराच्या बाजूला असलेल्या स्टेट बँक कॉलनीतही चोरीचा प्रयत्न झाल्याचे वृत्त आहे.नकाणे रोडला घरफोड्या होत असतांनाच तिकडे 80 फुटी रोडला देखील टायपिंग सेंटर फोडल्याचे वृत्त आहे. अभिजित श्रीकांत बनछोड यांचे 80 फुटी रस्त्यावर कार्नर टायपिंग इन्स्टीट्युट आहे. रात्री चोरट्यांनी हे इन्स्टीट्युट फोडून 8 ते 10 संगणक चोरले. चोरीला गेलेल्या संगणकांची किंमत 1 लाखाच्या घरात असल्याचे सांगितले जात आहे. चोरीची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी श्वान पथक ,ठसे तज्ञ पोहचले होते.
वीज नसल्याने साधला डाव
भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाउपाध्यक्षच्या घरासह तीन घरे चोरट्यांनी फोडली. तसेच 80 फुटी रोडला टायपींग सेेंटर फोडून 10 संगणक चोरले. चोरट्यांनी रात्रीतून लाखोंचा ऐवज लंपास केल्याचे बोलले जात आहे. देवपुरातील नकाणे रोडवरील एस.आर.पी कॉलनी जवळ असलेल्या समृध्द नगर प्लॉट नं.15 येथील सोनवणे हे धडगांवलाच राहतात.त्यांचे कूटुंब समृध्द नगरात राहते. रात्री पावसामुळे वीज नसल्याने जितेंद्र यांची पत्नी शैलेजा यांनी त्यांच्या मुलांना सोबत करत तिच्या घरापासून 5-6 घरे पुढे असलेल्या बहिणीच्या घरी झोपण्यासाठी गेली. चोरट्यांनी ही संधी साधली.