शतकी गोलचा मनसबदार रोनाल्डो

0

नवी दिल्ली । ख्रिस्तियानो रोनाल्डोने युरोपियन गोल्सचे शतक पूर्ण करताना रिअल माद्रिद संघाला चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पध्रेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या लीग लढतीत बायर्न म्युनिचवर 2-1 असा विजय मिळवून दिला.रोनाल्डोने 47व्या मिनिटाला डॅनिएल रामोसच्या पासवर अचूक गोल करून सामना 1-1 असा बरोबरीत आणला.

77व्या मिनिटाला मार्को विलेम्सेनच्या पासवर रोनाल्डोने गोल करत माद्रिदला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. या आघाडीबरोबरच रोनाल्डोने युरोपियन स्पर्धेत शंभर गोल करण्याचा मानही पटकावला. शतकी गोलनंतर ख्रिस्तियानो रोनाल्डोने सहकार्‍यांसोबत आनंद साजरा केला.