शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त छायाचित्रांचे प्रदर्शन

0

पुणे : शतकोत्तर रौप्यमहोत्सवी सार्वजनिक गणेशोत्सवाचे निमित्ताने महापालिकेने पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सहकार्याने छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. दि. 31 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत सकाळी 11 ते रात्री 11 पर्यंत सारसबागेसमोरील पालिकेच्या बाळासाहेब ठाकरे कलादालनात आयोजित करण्यात येणार आहे.

प्रदर्शनात गणेशोत्सवातील विविध कालावधीतील, विविध प्रसंगानुरूप छायाचित्रे पाहता येणार आहे. त्याचबरोबर स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी रेखाटलेली व्यंगचित्रे तसेच पुणे शहरातील ऐतिहासिक वास्तू, शैक्षणिक संस्था यांची छायाचित्रे व माहिती, विमानतळ, रस्ते अशा विविध विषयाशी संबंधित छायाचित्रे व माहिती प्रदर्शनात नागरिकांना पाहाता येणार आहे. याचे उद्घाटन महापौर मुक्ता टिळक यांचे हस्ते गुरुवारी सकाळी 11 वाजता होईल.