शत्रुंजय भावयात्रा कार्यक्रम

0

निगडी : जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जन्मकल्याण दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड जैन सोशल ग्रुप डायमंडतर्फे विविध कार्यक्रमांचे प्राधिकरण येथे आयोजन करण्यात आले होते. प्राधिकरण येथील ज्ञानप्रबोधिनीत शनिवारी (दि. 8) जैन बांधवांसाठी शत्रुंजय भावयात्रा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास जैन बांधवांनी चांगला प्रतिसाद दिला. संगीतकार पार्थ शहा व पंडित विराग शहा यांनी आपल्या सुरेल आवाजाने भाविकांना शत्रुंजय ही भावयात्रा गाण्यातून करविली. यावेळी जैन सोशल ग्रुपच्या माध्यमातून एज्युकॉन प्रोजेक्टची माहिती एज्युकॉनचे प्रमुख कामेश शहा यांनी दिली. या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत यातून करण्यात येते. कार्यक्रमात रेणुका मुन्नाळे हिला प्रशस्तीपत्रक देण्यात आले. यावेळी दीपक डागा, नयन भंडारी, सुनील शहा, राजकुमार जैन उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष अनुप शहा, सचिव पंकज गुगले, कोषाध्यक्ष प्रशांत गांधी तर जैन सोशल ग्रुप एज्युकॉनचे अध्यक्ष कामेश शहा, सचिव दीपक डागा, उपाध्यक्ष सुनील शहा, कमलेश चोपडा, अतुल धोका आदींनी केले.