शिरपूर । उत्तम क्षमा याचना करतांना नम्रता व उदरता असली पाहिजे. मित्र व कुटुंब यांची तर सर्व जन क्षमा मांगतात परंतू शत्रूंशी उत्तमक्षमापण करून मैत्रीभाव ठेवला पाहिजे, असा उपदेश पंडित रुपचंद जैन दर्मोह वाले यांनी समाज बांधवांना दिला. शत्रूंशी उत्तम क्षमा याचनेतून मैत्रीभाव साधयास शत्रूत्व दुर होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. पर्युषण पर्वानिमीत्त सामुदायिक उत्तमक्षमापणाच्या आयोजित कार्यक्रमात ते बालत होते. जैन दिगंबर मंदिरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित समाज बांधवांना उपदेश करतांना त्यांनी पर्युषण पर्वा निमित्ताने समाजाला धार्मिक उपदेश देण्याकरिता तारणपंथाचे पंडितजी रुपचंद जैन यांना मध्यप्रदेशातील दर्मोह येथून आमंत्रित करण्यात आले होते. पंडितजींनी उपस्थिती समाजबांधवांना उत्तमक्षमापना विषयी मार्गदर्शन केले.
प्रवचनातून संदेश
याप्रसंगी शिरपूर शहरातील सकल तारणपंथ जैन समाज जैन मंदिरात उपस्थित होते. चार महिन्याच्या चातुर्मासात अकरा दिवसाचे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजकांनी केले होते. दिगंबर जैन मंदिराला विद्युत रोषणाईने सजविण्यात आले होते. रुपचंदजी यांनी समाजबांधवांना उत्तम क्षमा करून प्रत्येकाशी मधुरवाणीत संभाषण करा मस्ताकावर शांततेसाठी बर्फ तर मधुर वाणीकरिता मुखामध्ये साखर असा संदेश प्रवचनातून दिला.
स्वामीवात्स्ल्य कार्यक्रम
प्रत्येक समाजबांधवांच्या घरी पालखी पूजा करण्यात आली. ’महावीर स्वीट’ चे संचालक राजेंद्र ओसवाल, प्रेमचंद ओसवाल, गौतम चोरडिया, उपेंद्र ओसवाल, रोशन चोरडिया यांनी शोभायात्रेतील भाविकांना प्रसाद म्हणून राजगीरा लाडू वाटप केले. आंबा बाजारातून निघालेली शोभायात्रेचे तारणतरण जैन दिगंबर मंदिरात समाप्ती करण्यात आली. समाजाकडून त्याचदिवशी स्वामीवात्स्ल्य ठेवण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिरपूर येथील जैन तारणपंथने परिश्रम घेतले.
नवकार महामंत्राचा जाप
बुधवारी 6 रोजी पहाटे 5 वाजता प्रभातफेरी काढण्यात आली. 6 ते 7 वाजता नवकार महामंत्राचा महाजाप दिगंबर जैन समाजाने नव्या चैत्यालयात आयोजित करण्यात आला होता. यावेळी महिलांसह पुरूष वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळी 9.30 वाजता शहरातील जैन तारणतरण चैत्यालयातून पालखीची बाजारपेठेच्या प्रमुख मार्गावरून शोभायात्रा काढण्यात आली बँण्डपथकाच्या धार्मिक वाद्यातून तरुणांसह वृध्दांनी नृत्याचा ठेका धरला होता. बुधवारी 6 रोजी पहाटे 5 वाजता प्रभातफेरी काढण्यात आली. 6 ते 7 वाजता नवकार महामंत्राचा महाजाप दिगंबर जैन समाजाने नव्या चैत्यालयात आयोजित करण्यात आला होता. यावेळी महिलांसह पुरूष वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळी 9.30 वाजता शहरातील जैन तारणतरण चैत्यालयातून पालखीची बाजारपेठेच्या प्रमुख मार्गावरून शोभायात्रा काढण्यात आली बँण्डपथकाच्या धार्मिक वाद्यातून तरुणांसह वृध्दांनी नृत्याचा ठेका धरला होता.