शनिपेठ,बळीरामपेठसह सुभाषचौक हॉकर्समुक्त

0

जळगाव । शहरातील मध्यवर्ती बाजारपेठेतील हॉकर्सचे स्थलांतर करुन देखिल भाजीपाला विक्रेत्यांसह फळविक्रेते मुळ जागेवरच बसत होते. यामुळे महापालिका प्रशासनाकडून सर्व विभाग प्रमुख व मोठा ताफ्यासह आज सोमवारी सकाळपासून धडक मोहीम राबवून बळीरामपेठ, शनिपेठ, सुभाष चौक, शिवाजी रोडसह शनिपेठ परिसर व गल्ल्या देखिल हॉकर्समुक्त करण्यात आल्या. मोहीमेदरम्यान सामान जप्त करण्यावरुन कर्मचारी व विक्रेत्यांमध्ये दोत ते तिन ठिकाणी बाचाबाची होवून गोंधळ निर्माण झाला होता.

पुन्हा त्याच ठिकाणी बसतात विक्रेते
बळीरामपेठ, सुभाष चौक, शिवाजी रोडवरील हॉकर्सला स्थलांतरीत करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहे. सुभाष चौकातील हॉकर्सला न्यु बी.जे. मार्केट परिसरातील पर्यायी जागेवर स्थलांतरीत करण्यात आले होते. परंतु पर्यायी जागेवर व्यवसाय न करता मूळ जागेवरच व्यवसाय सुरु आहे. दरम्यान बळीरामपेठ, सुभाषचौक, शिवाजीरोड व टॉवर रस्त्यावरील हॉकर्सला ख्वॉजामियॉ झोपडपट्टीच्या जागेवर तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतरीत करण्याबाबत महासभेने ठराव केला. त्यानुसार त्याअनुषंगाने ख्वॉजामियॉ झोपडपट्टीच्या जागेवर जेसीबीच्या साह्याने सपाटीकरण करण्यात आले. त्यानतंर लॉट पाडून अतिक्रमण विभागाने या भागातील विक्रेत्यांचे स्थलांतर केले. मात्र अपवाद वगळता भाजीपाला विक्रेते पुन्हा याच जागेवर व्यवसाय करीत होते. त्यामुळे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागातर्फे सोमवारी धडक कारवाई करण्यात येवून हॉकर्स हलविण्यात आले.

धडक मोहीम
महापालिका प्रशासनाकडून जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोरराजे निबाळकर यांच्या आदेशाने बळीराम पेठसह या संपूर्ण भागात धडक मोहीम राबविण्यात आली. विशेष म्हणजे सकाळी पावणेनऊ वाजता सुरु केलेल्या या मोहीमेत पालिकेच अतिक्रमण अधिक्षक एच.एम.खान, यांच्यासह सर्व विभागांचे विभाग मुख सहभागी झाले होते. प्रत्येक प्रमुखाला परिसर वाटून देवून मोहीमेला सुरुवात करण्यात आली.

या भागांमध्ये कारवाई ; धावपळ
या मोहीमेत सुभाषचौक, बळीरामपेठ, शिवाजी रोड, सुभाषचौक रस्ता या नेहमीच्या भागात तर कारवाई करण्यातच आली. त्यासह महात्मा गांधी मार्केट तसेच शनिपेठ भिलपुरा चौक, कुंभारवाडा, काट्या फाईल, इस्लामपुरा दुर्गा देवी मंदीर परिसर या भागातील विक्रेत्यावर कारवाई करण्यात आली. मनपाची पथके व वाहने येताच सकाळपासूनच माल घेवून विक्रेत्यांची धावपळ सुरु झाली. माल जप्त करण्यासाठी कर्मचार्‍यांच्या आटापीटा तर माल वाचविण्यासाठी विक्रेत्यांची ओढाताण सुरु होती.

बाचाबाचीमुळे गोंधळ
शनिपेठ परिसराच्या मागील गल्लीतील भाजीपाला जप्त करण्यावरुन अतिक्रमण विभागाचे पथक व विक्रेत्यांमध्ये बाचाबाची झाल्याने काहीवेळ गोंधळ निर्माण झाला होता. आजच्या मोहीमेत विक्रोत्यांसह अनेक वर्षापासून लागणार्‍या खाद्यपदार्थ विक्रीच्या हातगाड्या, कुंभाराचे मडके, इतर विक्रत्यांचे शेड देखिल काढण्यात आले दुपारी हा संपूर्ण परिसर हॉकर्स मुक्त झाला होता.

महापौरांना निवेदन
मोहीमेदरम्यान हॉकर्सनी महापौर ललित कोल्हे यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले. विक्रेत्यांचे प्रतिनिधी होनाजी चव्हाण यांनी देखिल या मोहीमेचा निषेध केला. यावेळी हॉकर्सतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पर्यायी जागेवर आमचा व्यवसाय होत नाही . त्यामुळे हॉकर्स धारकांना जुनी नगरपालिकेची जागा द्या. तसेच 20 पर्यत कायमस्वरुपी जागा उपलब्ध करुन द्यावी. खंडपीठाणे अठरा व्यपारी संकुलातील गाळे खाली करुन जाहिर लिलावाने गाळे देण्याची प्रक्रिया राबवुन थकीत भाडे वसुलीचे अंतिम आदेश दिलेले असताना ही गाळे धारकोंना अयोग्य लाभ राजकीय दबावाखाली नियम बदल करुन विनामुल्य गाळे व्यापार व्यापारांना सरकार देणार असेल तर विके्रत्यांना त्याच्या सुचवलेल्या पर्यायी जागेवर न पाठवता आहे त्या जागेवर व्यवसाय करण्याची प्रवानगी द्यावी. असेही निवेदनात म्हटले आहे. यावेळी हॉकर्ससोबत कॉग्रेसचे विष्णू घोडस्वार देखिल होते.