जुने जळगावात सट्टा अडडयांवर छापा ; 10 लाख 50 हजार 510 रुपयांचा ऐवज जप्त ; चार संशयितांना अटक
जळगाव :– शहरातील जुने जळगाव स्मशान भुमीच्या पाठीमागे खळवाडीतील ईमारतीवर पोलिस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्यासह पथकाने शनिवारी मध्यरात्री शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्याविरोधात वॉश आऊट मोहिम राबविली. सट्टा अड्डा व गावठी दारुच्या अड्डयावर कारवाई करण्यात आली. भास्कर काळे यांच्या मालकीच्या गोदामातून सुरु असलेल्या सट्टा अड्ड्याच्या कारवाईत पथकाने कार सहीत 10 लाख 50 हजार 510 रुपयांचा ऐवज जप्त केला असून चार संशयीतांना अटक करण्यात आली आहे. तर दुसरीकडे दोन ठिकाणी कारवाई करुन 2500 रुपये किमतीची गावठी दारु जप्त केली आहे. या घटनांप्रकरणी पोलीस कर्मचार्यांच्या फिर्यादीवरुन शनिपेठ पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
जागेसह गोदाम मालकाविरोधातही गुन्हा
शनिपेठ पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचारी सचिन सुरेश साळूंखे (वय-30) यांच्या तक्रारीत नमुद केल्या प्रमाणे, नेरीनाका स्मशान भुमीच्या मागील बाजूस जुने जळगाव परिसरात भास्कर काळे यांच्या मालकीच्या दुमजली ईमारतीतील गोदामात खंडू राणे (रा.जुने जळगाव)हा भाडोत्री बुकीद्वारे कल्याण मटका नावाचा सट्टा जुगाराचा अड्डा चालवत असल्याची माहिती मिळाली होती, डॉ.रोहन यांच्या पथकातील उपनिरीक्षक मनोहर जाधव, सुनील पाटील, रविंद्र मोतिराया, अशोक फुसे, रविंद्र सपकाळे, रफीक पटेल, जुबेर तडवी, महेश पवार, नंदकिशोर धनके, गणेश नेटके, योगेश ठाकूर, मुकेश पाटील, यांच्या सह क्युआरटी फोर्सच्या पथकाने चारही दिशांनी घेराव टाकून छापा टाकला असता, खंडू राणे यांच्या खळवाडीतील दुमजली इमारतीच्या कंपाऊंड मध्ये बाहेर (एम.एच.19.बी.एन.7744) हि महिंद्र एक्युव्ही आढळून आली. पथकाने गोदामात प्रवेश करताच सट्ट्याच्या आकड्यांचा उतारा घेणार्या बुकींची धांदल उडाली.
संशयित व जप्त केलेले साहित्य
7 मोबाईल संच, रोख रुपये, 2 सट्टा नोंदवण्याचे दोन बुक, 5 सट्टा नोंदण्याचे पावतीपुस्तके असे नावे असलेली , सट्ट्याचे दोन पावती पुस्तके , हिशेबाचे कॅलक्युलेटर :-6
संगणक सीपीयु 2 , सेट टॉप बॉक्स 1, खुर्च्या 3 , टिव्ही संच 1 , महिंद्रा एसयुव्ही कार 1 असा 10 लाख 50 हजार 510 रुपयांचा ऐवज जप्त केला. खंडू राणे, हेमंत भास्कर पवार (रा.नशिराबाद), लोकेश विलासराव अत्तरदे (रा.गोपाळपुरा, जळगाव), पवन सुरेश सोनार (रा.श्रीकृष्ण नगर, जळगाव) व सुनील तुकाराम शिंदे (रा.नशिराबाद) यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
25 लीटर गावठी दारु जप्त
सट्टा अड्डयासह पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने गावठी दारु विक्रीवर कारवाई करुन गावठी दारु जप्त केली. यात पहिल्या कारवाईत पथकाने कोळीपेठ परिसरातून गंधानाला येथून 20 लीटर 2 हजार रुपये किमतीची गावठी दारु जप्त केली. विक्री करणार्या महिला फरार झाली असून बायजाबाई असे तिचे नाव आहे. तर दुसर्या कारवाईत पथकाने वाल्मिक नगरातून 5 लिटर 500 रुपये किमतीची गावठी दारु जप्त केली, या कारवाईत विक्री करणारी महिला लिलाबाई राजेंद्र सोनवणे ही फरार झाली होती. दोन्ही घटनांप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.