जळगाव। बसमध्ये चढत असतांना गर्दीचा फायदा घेत प्रवासी तरूणाचा महागडा मोबाईल चोरणार्या भामट्यास बुधवारी शनिपेठ पोलिसांनी जेरबंद केले आहे. यातच त्याच्याकडून चोरीला गेलेला 20 हजार रुपये किंमतीचा महागडा मोबाईलही हस्तगत करण्यात आला आहे. तर त्याच्याकडून आणखी कही चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
जामनेर शहरातील इंद्र ललवाणी नगरातील रहिवासी शुभम संजू पाटील (वय-20) हा तरूण जळगावात आला होता. त्यानंतर काम आटोपून पुन्हा जामनेर जाण्यासाठी 4 ऑगस्ट रोजी नवीन बसस्थानकावर आल्यानंतर दुपारी 12.40 वाजता बसमध्ये चढत असतांना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने शुभमच्या पॅन्टच्या खिशातून 20 हजार रूपये किंमती मोबाईल चोरून नेला होता. यानंतर 8 ऑगस्ट रोजी याप्रकरणी शुभम याच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, आज बुधवारी सकाळी शनिपेठ पोलिस ठाण्याचे डिबी कर्मचारी जितेंद्र सोनवणे व अमित बाविस्कर यांना बसस्थानकावरील मोबाईल चोरीतील संशयित हा कोळीपेठेतीत असून त्याच्याकडे एक महागडा मोबाईल असल्याची माहिती मिळाली.
कोळीपेठेतून घेतले ताब्यात
त्या माहितीच्या आधावरावर पोलिस निरीक्षक प्रविण वाडीले यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सुरेश सपकाळे, जितेंद्र सोनवणे, अमित बाविस्कर, गणेश गव्हाळे संशयितास अटक करण्यासाठी पाठविण्यात आले. सकाळी 10 वाजता कोळी पेठत सापळा रचून पोलिस पथकाने संशयित मोबाईल चोरटा मोहन प्रकाश भारूडे (वय-20 रा. कोळीपेठ) याला अटक केली. यावेळी त्याची झाडाझडती घेतली असता त्याच्याकडून चोरीला गेलेला महागडा मोबाईल मिळून आला आहे. तसेच त्यास पूढील कारवाईसाठी जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.