आकांक्षा बालरंगभूमी आयोजित दुसरा बालरंगोत्सव
पुणे: आकांक्षा बालरंगभूमी आयोजित दुस-या बालरंगोत्सवाचे आयोजन आज पासुन दोन दिवस करण्यात आले आहे. बालरंगोत्सवात ड्रामेबाज व सुपर डान्सर या दोन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. शहर आणि ग्रामिण भागातील कलाकारांचा स्नेहमेळावा बालरंगोत्सवाचा एक महत्वपूर्ण भाग आहे.
त्याचबरोबर बालकलाकार व सिनेनाट्य क्षेत्रातल्या मान्यवरांचे चर्चा व परिसंवाद आणि बालनाट्य पुस्तक प्रकाशन असे भरगच्च कार्यक्रम दुस-या बालरंगोत्सवात असणार आहेत.जेष्ठ अभिनेत्री सुषमा देशपांडे आणि माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांच्या उपस्थितीत,आकांक्षा बालरंगभूमी अंगणमंच, वनदेवी मंदिर परिसर कर्वेनगर येथे बालरंगोत्सव रंगणार आहे.
शंभरपेक्षा जास्त बालकलाकारांचा सहभाग
पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी भव्य एकपात्री अभिनय ड्रामेबाज स्पर्धेची अंतिम फेरी शनिवारी आहे. ड्रामेबाज स्पर्धा मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत तसेच चार गटात होणार असून यामध्ये 100 हून अधिक बालकलाकारांनी सहभाग घेतला होता. एकल नृत्य स्पर्धा सुपर डान्सरची अंतिम फेरी रविवारी होणार असल्याची माहिती आकांक्षा बालरंगभूमीचे सागर लोधी यांनी दिली आहे.