शनिवारी ‘आठवणीतील मुंडे साहेब’ या विषयावर व्याख्यान

0

पुणे, पिंपरी महापौरांचा होणार सत्कार

रहाटणी : दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या 68 व्या जयंती निमित्त पिंपरी-चिंचवड शहर लोकनेते गोपीनाथ मुंडे जंयती समितीतर्फे येत्या शनिवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘आठवणीतील मुंडे साहेब’ या विषयावर शिवव्याख्याते अशोक बांगर यांचे व्याख्यान होणार आहे. याप्रसंगी पुणे महापालिकेच्या महापौर मुक्ता टिळक, पिंपरीचे नितीन काळजे, आळंदीच्या नगराध्यक्षा वैजंयती उमरगेकर, पायलट रमीला लटपटे यांचा पंकजा मुंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.

थोपटे लॉन्स येथे शनिवारी दुपारी चार वाजता होणार्‍या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामविकास, महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे असणार आहेत. यावेळी महापौर नितीन काळजे, पालकमंत्री गिरीश बापट, पशुसंवर्धन व मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य राज्यमंत्री दिलीप कांबळे, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक , खासदार अनिल शिरोळे, अमर साबळे, आमदार महेश लांडगे, लक्ष्मण जगताप, माधुरी मिसाळ, महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर, भाजपच्या सचिव उमा खापरे, संघटन मंत्री सुनील कर्जतकर, रवी अनासपुरे, भाजपचे पुणे शहराध्यक्ष योगेश गोगावले, पीएमआरडीएचे अध्यक्ष किरणकुमार गीते, ज्येष्ठ नेते आझम पानसरे, सचिन पटवर्धन, उपमहापौर शैलाजा मोरे, सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे आदी उपस्थित राहणार आहेत.

त्यांची इच्छा पुर्ण झाली!
‘आठवणीतील मुंडे साहेब’ या विषयावर शिवव्याख्याते अशोक बांगर यांचे व्याख्यान होणार आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि आळंदी नगरपरिषदेत भाजपची सत्ता यावी, अशी गोपीनाथ मुंडे यांची इच्छा होती. महापालिका आणि नगरपरिषदेमध्ये भाजपची एकहाती सत्ता आली. मुंडे साहेब आपल्या कार्यकर्त्यांना नेहमी प्रेमाने वागवत. अनेक नेते, कार्यकर्ते यांना आपल्या सोबत पुढे नेले आहे. त्यामुळेच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या आयोजनात लोकनेते गोपीनाथ मुंडे जयंती पिंपरी-चिंचवड समितीचे शहर जिल्हा निमंत्रक व भाजपच्या प्रदेश कार्यकारणीचे सदस्य सदाशिव खाडे, उद्योजक आबाशेठ नागरगोजे, नगरसेवक केशव घोळवे, नगरसेविका योगिता नागरगोजे, माजी नगरसेवक रघुनंदन घुले, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक नागरगोजे, भगवान सेना पिंपरी-चिंचवड, राष्ट्रसंत भगवानबाबा प्रतिष्ठण पुणे, मराठवाडा मित्र मंडळ, लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्टाण पिंपरी-चिंचवड, लोकनेते गोपीनाथ मुंडे विचार मंच पिंपरी-चिंचवड, बीड जिल्हा मित्र मंडळ, मराठवाडा जन विकास संघ पिंपरी-चिंचवड, भगवान बाबा मित्र मंडळ, जय भगवान महासंघ यांनी पुढाकार घेतला आहे. या कार्यक्रमाला पुणे, पिंपरी-चिंचवड परिसराती मुंडे प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन, आयोजकांनी केले आहे. कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी 9923103459 अथवा 8888880007 यांच्याशी संपर्क साधावा.