शनिवारी वाडा सुशोभिकरणास 57 लाखांची मंजुरी

0

पुणे : शहरातील ऐतिहासिक वास्तू असलेल्या शनिवारी वाडा परिसराचे सुशोभिकरण आणि वाड्याच्या समोर असलेल्या श्रीमंत बाजीराव पेशवेच्या पुतळ्याच्या दुरुस्तीसाठी 57 लाखांच्या प्रस्तावाला स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

काही दिवसांपूर्वी श्रीमंत बाजीराव पेशव्यांची जयंती साजरी करण्यात आली होती त्यावेळी शनिवार वाडा परिसरात असलेल्या पेशव्यांच्या पुतळ्याच्या दुरवस्था पाहता समाजसेवी संस्थांनी पालिका प्रशासनावर ताशेरे ओढले होते. यानंतर पालिका प्रशासन पुतळा दुरुस्ती, बैठक व्यवस्था आणि शनिवार वाडाचे सुशोभीकरण करण्यासाठी 57 लाखांची तरतुदीला मंजुरी देण्याचा प्रस्ताव स्थायी समिती समोर ठेवला होता त्यास मंजुरी देण्यात आली.