जळगाव – शनिवारी या वर्षातील पहिला लग्नाचा मुहूर्त होता. या मुहूर्तावर पहिल्याच दिवशी शहरात तब्बल दीडशेहून अधिक विवाह सोहळे पार पडले. धोरणामुळे गेल्या दोन वर्षापासून विवाह सोहळा मर्यादा होती त्यामुळे अनेकांना साध्या पद्धतीने विवाह सोहळे जावे लागत होते मात्र आता फारसे कडक नियम नसल्यामुळे लग्नकार्य मोठे जंगी झाले.
जळगाव शहरात लहान-मोठे 30 ते 35 मंगल कार्यालय आहेत या दोन दिवशी शुभ मुहूर्त असल्याने सर्वच मंगल कार्यालय पूर्णपणे बुक होते. यामुळे या सर्व व्यवसायिक खुश आहेत.
लग्न मध्ये पाहुण्यांच्या संख्येवर मर्यादा असल्याने केटरिंग व्यवसाय अत्यंत मर्यादित होता मात्र आता पुन्हा एकदा लग्नसोहळे सुरू झाल्याने या व्यवसायात पुन्हा एकदा मोठी तेजी पाहायला मिळत आहे.