शनिवार आठवड बाजारातून मोटारसायकल लंपास

0

चाळीसगाव – शहरातील नागद रोडवरील किराणा दुकानासमोरुन अज्ञात चोरट्याने २५ ऑगस्ट २०१८ रोजी सकाळी ११ ते १२ वाजेदरम्यान मोटारसायकल चोरुन नेली असुन चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी चाळीसगाव शहरात नागद रोडवर शनिवारी आठवडे बाजार भरत असतो या बाजारात किराणा बाजार करण्यासाठी तालुक्यातील रोकडे येथील शांताराम विट्ठल पाटील (वय- ४२) हे त्यांची हिरो होंडा मोटारसायकलवर २५ ऑगस्ट २०१८ रोजी आले होते. नागदरोडवरील आठवडे बाजारातील प्रणव किराणा दुकानाबाहेर त्यांची २० हजाराची मोटारसायकल लावुन ते किराणा घेत असताना सकाळी ११ ते १२ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांची मोटारसायकल चोरुन नेली आहे याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला त्यांनी आज फिर्याद दिल्यावरुन अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस नाईक संदीप तहसिलदार करीत आहेत.