शब्दांचा खेळ करून शेतकर्‍यांची थट्टा ; दुष्काळ जाहीर होण्यासाठी 17 रोजी महारॅली

0

जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांचा इशारा ; 50 हजार दुचाकींद्वारे एक लाख शिवसैनिक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार

भुसावळ- पेट्रोल-डिझेलची दरवाढ करून देशातील जनतेची लूट सुरू आहे. पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणून तत्काळ इंधनाच्या किमती रुपयात कमी कराव्यात, राज्य सरकारने दुष्काळसदृश परीस्थिती जाहीर केली असून संबंधीत गावांना मदत मिळू नये अशा प्रकारच्या जाचक अटी लादल्या आहेत. शब्दांचा खेळ करून शेतकर्‍यांची दिशाभूल केली जात आहे. दुष्काळसदृश परीस्थिती म्हणजे शेतकरी बांधवाला एक नाणा मिळणार नाही, म्हणून दुष्काळ लवकर जाहीर करावा यासाठी रावेर लोकसभा क्षेत्रातून चोपडा, रावेर, यावल, भुसावळ, जामनेर, मुक्ताईनगर आणि बोदवड तालुक्यातून 50 हजार दुचाकींची
महारॅली एक लाख शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या सोबत जिल्हाधिकारी कार्यालयावर स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी, 17 नोव्हेंबर रोजी काढण्यात येणार असल्याची माहिती शासकीय विश्रामगृहात जिल्हास्तरीय शिवसेनेच्या बैठकीत शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील यांनी दिली.

महाराष्ट्रात इंधन दर जीएसटी कक्षेत आणावेत
आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती 30 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत पण सरकारने पेट्रोल व डिझेलच्या किमती वाढवल्या आहे. सरकारने इंधन दरवाढ करून सर्वसामान्यांची लूट चालवली आहे. शिवाय अन्य राज्यांपेक्षा महाराष्ट्रातील इंधनाचे दर खूप जास्त आहेत. त्यामुळे पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणून तत्काळ इंधनाच्या किमती कमी कराव्यात, अशी मागणी महारॅली दरम्यान करण्यात येणार आहे.

यांची होती बैठकीला उपस्थिती
सुरुवातीला भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करून बैठकीला सुरुवात झाली. प्रसंगी उपजिल्हा प्रमुख प्रल्हाद महाजन, उपजिल्हा प्रमुख डॉ. मनोहर पाटील, मुन्ना पाटील, भुसावळ तालुकाप्रमुख समाधान महाजन, मुक्ताईनगर तालुका प्रमुख छोटू भोई, रावेर तालुका प्रमुख योगीराज पाटील, यावल तालुका प्रमुख रवी सोनवणे, जामनेर तालुका प्रमुख पंडित सोनवणे, भुसावळ तालुका संघटक प्रा.धीरज पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे, उपतालुका प्रमुख मनोहर बारसे, हिरामण पाटील, शहर प्रमुख निलेश महाजन, बबलू बर्‍हाटे, शहर संघटक योगेश बागुल युवासेना जिल्हा अधिकारी अविनाश पाटील, युवासेना चिटणीस सुरज परदेशी, महिला आघाडी जिल्हा संघटिका पूनम बर्‍हाटे, तालुका संघटिका उज्जला बागुल युवासेना व महिला आघाडी पदाधिकारी उपस्थित होते.