शब्ब-ए-बारातच्या पार्श्वभूमीवर नंदुरबारात संचारबंदीचे आदेश

0


नंदुरबार। शब्ब-ए-बारातच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मशिदी, कब्रस्थान व दर्ग्यांच्या 200 मीटर परिसरात 9 एप्रिल 2020 रोजी सायंकाळी 6 वाजेपासून 10 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत पुर्णत: संचारबंदी लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग म्हणून जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तथापि जीवनावश्यक वस्तू व सेवांना संचारबंदीतून वगळण्यात आले आहे. शब्ब-ए-बारातनिमित्त वरील ठिकाणी गर्दी होऊन संचारबंदीचे उल्लंघन होऊ शकत असल्याने या परिसरात पुर्णत: संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहेत.