‘शमशेरा’मध्ये रणबीर आणि संजय दत्तसोबत काम केल्याचा अभिमान – रोनित रॉय

0

मुंबई : छोट्या आणि मोठ्या पडद्यावर स्वतःची छाप निर्माण करणारा अभिनेता रोनित रॉयने आगामी ‘शमशेरा’ चित्रपटाच्या शूटींगला सुरुवात केली आहे. रणबीर कपूर आणि संजय दत्तसोबत काम केल्याचा अभिमान वाटत असल्याचे त्याने सांगितले.

रोनितने आपल्या ट्विटरवर म्हटले, ”दिग्दर्शक करण मल्होत्रा यांच्यासोबत मी ‘शमशेरा’ चित्रपटाच्या शूटींगला सुरुवात केली. यात मी रणबीर कपूर आणि संजय दत्तसोबत काम करीत आहे. करण मल्होत्रा आणि यशराज फिल्म्सने मला या चित्रपटाचा भाग बनवल्याबद्दल त्यांचे आभार.”

या चित्रपटात वाणी कपूरही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.