शम्मी चावरीयावर हल्ला, पाच आरोपींना अटक

0

दोघा पसार आरोपींचा बाजारपेठ पोलिसांकडून शोध

भुसावळ (प्रतिनिधी)- शहरातील वाल्मीक नगर भागातील रहिवासी असलेल्या शम्मी प्रल्हाद चावरीया (30) या तरुणावर सात जणांनी लोखंडी रॉड डोक्यात टाकून प्राणघातक हल्ला केल्याची घटना सोमवारी रात्री आठच्या सुमारास पांडुरंग टॉकीजजवळ घडली होती. याप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली असून अन्य दोघे पसार झाले आहेत. मंगळवारी गोदावरी रुग्णालयात जावून उपनिरीक्षक विवेक नरवाडे यांनी जवाब नोंदवल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. रायसिंग सरदारसिंग पंडित, अजयसिंग उर्फ पापाराम रायसिंग पंडित, सोनू रायसिंग पंडित, अक्षय उर्फ भैस की मुंडी, अजय गणेश काळे, तुषार गणेश व सागर (पूर्ण नाव नाही, सर्व रा.वाल्मीकनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील पाच आरोपींना अटक करण्या आली असून अन्य दोघे मात्र पसार आहेत. तपास उपनिरीक्षक निशीकांत जोशी करीत आहेत.