शरजील इमाम कडून चौकशी दरम्यान उडवाउडवीची उत्तरे

0

नवी दिल्ली: देशात सीएए, एनआरसी कायदा लागू झाल्यानंतर अनेक ठिकाणी आंदोलने केली जात आहे. दिल्लीतील शाहीन भाग येथे शरजील इमाम याने भडकाऊ भाषण करत आसाम राज्य देशापासून तोडण्याची भाषा केली होती. भाषण केल्यानंतर शरजील इमाम विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अनेक दिवस पोलिसांना चकवा देत शरजील बरेच दिवस फरार होता. पोलिसांनी त्याला बिहार मधून अटक करण्यात आली होती. अटक केल्यानंतर शरजीलच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. गेल्या पाच दिवसांच्या चौकशी दरम्यान तो सतत गुन्हे शाखेच्या तपास अधिकाऱ्यांना टोलवाटोलवीची उत्तरं देत आहे.

तीन दिवसांच्या रिमांड दरम्यान, गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी शरजीलच्या जवळील लोकांना नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. या सर्वांची बुधवारी चौकशी केली जाऊ शकते. केंद्रीय अन्वेषण यंत्रणांच्या चौकशीत जमाव भडकवण्यासाठी आणि हिंसाचार पसरविण्यासाठी देशभरात उघडलेल्या पीएफआयच्या ७३ बँक खात्यांमध्ये १२० कोटींची रक्कम जमा करण्यात आली आहे. म्हणूनच सीएए आणि एनआरसीच्याविरोधात हिंसा पसरवण्यामागे पीएफआयची महत्त्वाची भूमिका असल्याचं सांगण्यात येत आहे.

शाहीन बागेत त्याचे कार्यालय आहे. यूपी पोलिसांनी वेगवेगळ्या जिल्ह्यात कारवाई करत अनेक आरोपींना अटक केली आहे. त्यामुळे दिल्ली पोलिसांची गुन्हे शाखा पीएफआयच्या दृष्टीने तपास करत आहे. शरजीलच्या बँक खात्यात सध्या पोलिसांना कोणतेही संशयास्पद व्यवहार आढळलेले नाहीत. शरजीलपासून जप्त केलेला लॅपटॉप, डेस्कटॉप, मोबाईल, पुस्तके आणि पत्रके सापडल्याचा धक्कादायक पुरावा सापडल्याचा दावा गुन्हे शाखेने केला आहे.