शरदकुमारला रौप्य, वरुणला कांस्यपदक

0

लंडन । भारताच्या शरदकुमार आणि वरुण भाटीने जागतिक पॅरा अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत देशाला दुहेरी यश मिळवून दिले. स्पर्धेतील उंच उडी स्पर्धेच्या टी-42 गटात शरदकुमारने रौप्यपदक तर वरुण भाटीने कांस्यपदकाची कमाई केली. रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकल्यांपासून वरुण भाटी सत्कार समारंभातच व्यस्त होता. जागतिक स्पर्धेसाठी लंडनला रवाना होण्यापूर्वीही वरुणने सराव शिबिरातून एक दिवस सुट्टी घेत मुंबईतील एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यामुळे पोलिओच्या बळी ठरलेल्या 22 वर्षीय वरुण यावेळी पदकाला मुकणार असाच सगळ्यांचा होरा होता.

मात्र शनिवारी रात्री उशीरा झालेल्या स्पर्धेत वरुणने टी-42 गटात 1.77 मीटर अशी कामगिरी साधत आपल्या बॅगेत आणखी एका कांस्यपदकाची भर टाकली. रौप्यपदक जिंकणार्‍या शरदने 1.84 मीटर अशी वैयक्तिक कामगिरी उंचावत पदक मिळवले.