मुंबई: भाजपच्या एका नेत्याने ‘कल के शिवाजी आज के मोदी’ हे पुस्तक लिहून त्याचे भाजप कार्यालयात प्रकाशन केले. यावरून संपूर्ण देशात भाजपवर टीका होत आहे. दुसरीकडे भाजपकडून शरद पवार यांना लक्ष केले जात असून शरद पवार यांना जाणता राजा संबोधण्यावर भाजपने आक्षेप घेतले आहे. दरम्यान यावर बोलताना शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शरद पवार हे जाणते राजाच आहे असे म्हटले आहे. राज्याची संपूर्ण माहिती ज्यांना आहे त्यांनाच जाणता राजाच म्हटले जाते. शरद पवार यांच्या नावामुळे महाराष्ट्राचे नाव देशभरात आहे असे म्हणत राऊत यांनी शरद पवार हे जाणता रजेच आहे असे म्हटले आहे. लोकमतला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. जनतेने शरद पवारांना जाणता राजा उपाधी दिली आहे असेही संजय राऊत यांनी सांगितले.
अजित पवार सरकारच्या गाडीचे स्टेपनी : संजय राऊत
महाविकास आघाडीचे सरकार हे तीन चाकाचे सरकार आहे असे बोलले जाते. या तीनचाकी सरकारच्या गाडीचे उपमुख्यमंत्री अजित पवार स्टेपनी असल्याचे सांगत स्टेपनीशिवाय गाडी चालूच शकत नाही असे गौरोद्गार शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी काढले.