मुंबई: काल राष्ट्रवादीचे बलाढ्य नेते माजी उपमुख्यमंत्री आमदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती. त्यानंतर अजित पवार यांच्याशी कोणाचाही संपर्क होऊ शकलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी अजित पवार यांनी संपर्क केला असून ते आपल्या राजीनाम्यावर ठाम असल्याचे बोलले जात आहे. त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. ईडीचा जो गलिछ्छ प्रकार सुरु आहे. त्या क्लेषातून राजकारणातूनच निव़ृत्त होण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. ते कोणत्याही परिस्थितीत मागे फिरण्यास तुर्तास तरी तयार नसल्याची माहिती मिळत आहे. शरद पवार यांचा अजित पवारांना अल्टिमेटम दिला असून, दुपारी 3 वाजेपर्यंत अंतिम निर्णय कळवण्याचा संदेश दिला आहे.
शरद पवार यांचे त्यांना समजाविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. कुटुंबातील सर्व सदस्यांकडून अजित पवार यांची मनधरणी करण्यात येत आहे. लवकरच अजित पवार त्यांच्या निर्णयाबाबत पुन्हा एकदा विचारविनिमय करतील असेही सांगण्यात येत आहे.
अजित पवार यांनी राजीनामा दिल्यापासून त्यांच्या सोबत फक्त सुनिल तटकरे असून शिष्टाईचे ते प्रयत्न करत आहेत. सुनिल तटकरे व शरद पवार यांच्यात संपर्क होत आहे. लवकरच अजित पवार व शरद पवार यांच्यात भेट व्हावी यासाठी तटकरे मध्यस्थी करत आहेत.