नवी दिल्ली- इंधन दरवाढी विरोधात आज संपूर्ण भारतात बंदची हाक देण्यात आली आहे. त्यानिमित्ताने आज प्रमुख विरोधी पक्षाचे नेते रामलीला मैदानावर एकत्र जमले आहे. दरम्यान यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर चांगलेच तोंडसुख घेत टीकेची झोड उठवली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठ्या दाव्याने सांगतात की, जे ४० वर्षात झाले नाही ते ४ वर्षात भाजप सरकारने करून दाखविले आहे असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात. मोठ्या बहादुरकीने मोदी सांगतात, मात्र रुपयाची घसरण आणि तेलाच्या किंमती वाढवून मोदींनी बहादुरी दाखविली आहे असे आरोप शरद पवार यांनी केला.
मोदी सरकारकडून शेतकऱ्यांचा अपमान
गेल्या ४० वर्षात देशात काहीही विकास झाला नाही असे मोदी सांगतात मात्र ४० वर्षात देश कृषी क्षेत्रात स्वयंपूर्ण झाला आहे हे सत्य नाकारून चालणार नाही. ४० वर्षात काहीही झाले नाही हे सांगून मोदी सरकार शेतकऱ्यांचा अपमान करत असल्याचे आरोप शरद पवार यांनी केला.