‘शरद पवारांचे काम राजकारणाच्या पलीकडले’

0

पुणे। पद्मभूषण शरद पवारांचे काम हे राजकारणाच्या पलीकडचे असून त्यांनी कायमच देशहिताला प्राधान्य दिले आहे. शेती आणि शेतकर्‍यांसाठी त्यांचे योगदान मोठे असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे काम चांगल्या प्रकारे सुरू आहे, अशा शब्दात केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रविवारी ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमने उधळली.

कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शताब्दी वर्ष सांगता कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात जेटली बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस प्रमुख पाहुणे तर अध्यक्षस्थानी शरद पवार होते. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे काम योग्य नियोजनामुळे चांगल्या प्रकारे सुरू आहे. या यशस्वीतेमागे संस्थेचा सचोटीचा व्यवहार कारणीभूत आहे. शेतकर्‍यांना कमी व्याजदराने पैसे देण्याचे काम या बँकेने केले आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.