शरद पवारांच्या ताफ्यातील वाहनाला अपघात

0

पुणे:राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाहन ताफ्यातील एक मोटार उलटल्याची घटना आज सकाळी साडे दहा च्या सुमारास झाली. शरद पवार सकाळी मुंबईच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला.

सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवीतहानी झाली नाही. मात्र दोन जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याहून मुंबईच्या दिशेने शरद पवार निघाले होते. तेव्हा, पाठीमागील पोलीस व्हॅन एमच१२ एनयु५८८१ ही अचानक उलटली. यामुळे यातील वाहनचालक आणि एक अधिकारी जखमी झाले.

हा अपघात अमृतांजन पुलाजवळ झाला. दरम्यान, अपघात झाल्याने शरद पवार यांनी त्यांची गाडी थांबवून अपघातात जखमी झालेल्यांची विचारपूस केली आणि त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले.