जळगाव: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज जळगावात प्रचारसभा सुरु आहे. यावेळी मोदींनी विरोधकांवर सरसंधान साधले. मोदींनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर जोरदार तीकाश्त्र सोडले. शरद पवारांना माध्यमांमध्ये प्रसिद्धी मिळविण्याची मोठी हौस आहे. दोन दिवसांपूर्वी शरद पवारांच्या सभेत एक कार्यकर्ता पुढे येण्याचा प्रयत्न करत आहे, त्यावेळी शरद पवार त्याला बाजूला करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यावरून मोदींनी शरद पवारांना लक्ष केले.
शरद पवारांसारखा नेता अद्यापही प्रसिद्धीसाठी धडपड करत असतात, एखादा नेता पुढे जाऊ नये अशी शरद पवारांची नीती असल्याचे नरेंद्र मोदींनी सांगितले.