शरद पवारांनी ईडीच्या कार्यालयात जाणे थांबविले

0

मुंबई: महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मुंबईतील कार्यालयात शुक्रवारी स्वत:च उपस्थित राहणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी जाहीर केले होते. त्यामुळे ‘ईडी’समोरच पेच निर्माण झाले होते. त्यामुळेच ईडीने शरद पवार यांना पत्र पाठवून कार्यालयात न येण्याची विनंती केली होतील. त्यामुळे शरद पवार यांनी ईडीच्या कार्यालयात जाणार नसल्याचे जाहीर केले आहे.

मी गृहमंत्री म्हणून काम पाहिलेले आहे, त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मी ईडीच्या कार्यालयात न जाण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीने सहाय्यक पोलीस आयुक्त आणि पोलीस आयुक्तांनी भेट घेतली. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले. माझ्यामुळे कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी तूर्तास ईडीच्या कार्यालयात जाण्याचा निर्णय तहकूब केल्याची माहिती शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली.

शिष्टमंडळ ईडी कार्यालयात

शरद पवार ईच्या कार्यालयात जाणार नसले तरी राष्ट्रवादीतर्फे काही नेत्यांचे शिष्टमंडळ ईडी कार्यालयात जाऊन निवेदन देणार असल्याचे बोलले जात आहे.

शिवसेनेचे आभार

शरद पवार यांना राजकीय सूडबुद्धीने गोवले जात असल्याचे आरोप होत असताना सत्ताधारी शिवसेनेने देखील शरद पवारांना पाठींबा दिला आहे. त्यामुळे शरद पवार यांनी शिवसेनेचे आभार मानले आहे.