मुंबई: राज्यात परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जवळपास ७० टक्के पिके वाया गेली आहे. दरम्यान आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणी दौऱ्यावर आहेत. आज शुक्रवारपासून त्यांनी दौरा सुरु केला आहे. आज त्यांनी एका द्राक्ष बागाला भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांनी परिस्थिती समजून घेतली.