शरद पवारांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

0

नवी दिल्ली : बुधवारी संसदेचे कामकाज आटोपल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. संसद भवनातील पंतप्रधान कार्यालयात ही भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये 15 ते 20 मिनिटे झालेल्या चर्चेचा तपशील समजू शकला नसला तरी शेतकरी कर्जमाफीबाबत शरद पवारांनी पंतप्रधानांसोबत चर्चा केल्याचे समजते.

मोदी-पवार भेटीनंतर राजकीय वर्तुळात दिवसभर विविध चर्चा सुरू होत्या. पाच राज्यांमधील निवडणुकांच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी प्रथमच संसदेच्या कामकाज सहभागी झाले होते. प्रश्नोत्तराचा तास सुरू असताना नरेंद्र मोदी लोकसभेत दाखल झाले. पाच राज्यातील निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशाबद्दल उपस्थित खासदारांनी मोदींचे टाळ्या वाजवून व घोषणा देऊन स्वागत केले. संसदेतील कामकाज आटोपल्यानंतर पवार यांनी पंतप्रधानांची भेट घेऊन चर्चा केली.