पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ७० जणांविरोधात शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी ‘ईडी’ने गुन्हा दाखल केला आहे. याच्या निषेधार्थ आज राज्यभरात निदर्शने केली जात आहे. विरोधकांचं तोंड बंद करण्यासाठी ईडीचा शस्त्र म्हणून वापर केला जातो आहे असे आरोप छगन भुजबळ यांनी केला असून त्यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे.
- पवारांना पाठिंबा देण्यासाठी बारामतीमध्ये हजारो नागरिक रस्त्यावर उतरले आहे. बारामतीत आज बंद पाळण्यात आला आहे. बारामतीत शाळा, महाविद्यालयांनाही सुट्टी देण्यात आली आहे. पुण्यातही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात येणार आहेत.
- औरंगाबादमध्ये भाजप सरकारच्या हुकूमशाहीविरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अर्धनग्न आंदोलन करत निदर्शने केली.