शरद पवार आणि राज ठाकरे यांनी सोबत निवडणूक लढविली तरी फरक नाही- दानवे

0

मुंबई- शरद पवार आणि राज ठाकरे यांनी एकत्र निवडणूक लढवली तरी भाजपाला फरक पडत नाही असे वक्तव्य भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले आहे. शरद पवार आणि राज ठाकरे यांची विमान प्रवासादरम्यान झालेल्या भेटीची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी सोबत निवडणूक लढवली तरी भाजपला काही फरक पडत नाही. कारण भाजपा नशिबाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, असे रावसाहेब दानवे यांनी सांगितले आहे.

रावसाहेब दानवे यांनी पुढे बोलताना शिवस्मारक राजभवनच्या जागी उभारावे या मताशी आम्ही सहमत नसल्याचे म्हटले आहे. मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी शिवस्मारक राजभवनात उभारले गेले पाहिजे अशी मागणी केली आहे.

मागच्या सरकार पासून ही प्रक्रिया सुरू आहे. भूमिपूजन झाले आहे. आता स्मारक उभारण्याची प्रक्रियादेखील सुरू झाली आहे. पायाभरणी वेळी झालेली दुर्दैवी घटना पुन्हा होणार नाही यासाठी सरकार उपाययोजना करेल असे रावसाहेब दानवे यांनी सांगितले.