मुंबई: राज्यात राजकीय भूकंप होत, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी शपथविधी घेतला. हा निर्णय एकट्या अजित पवारांचा आहे, असे ट्वीट शरद पवार यानिम केले आहे. या मुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात फुट पडल्याचे चिन्हे दिसत आहे. आज दुपारी शिवसेनेना प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार हे सयुंक्त पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत नेमके शरद पवार काय बोलतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सुप्रिया सुळे यांनी आपल्या स्टेट्सला राष्ट्रवादी पक्षात, तसेच पवार कुटुंबात फुट पडली असल्याचे नमूद केले आहे. राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली असून २२ आमदार अजित पवारांसोबत असल्याची माहिती समोर येत आहे.