शरद पवार घेणार आज नरेंद्र मोदींची भेट

0

नवी दिल्लीः राष्ट्रवादीचे प्रमुख आणि खासदार शरद पवार आज संसदेत दाखल झाले. महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या प्रश्नावर आज दुपारी १२ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. या भेटीत महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेबाबत चर्चा होणार असल्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी लावली आहे. या भेटीकडे शिवसेना सहित कॉंग्रेस पक्षाचे लक्ष लागुन राहिले आहे. गेल्या महिन्याभरापासून राज्यात सरकार स्थापन झाले नसून याविषयी चर्चा होणारा असल्याचे बोलले जात आहे.

ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात परतीच्या पावसाने शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शेतकऱ्याना तात्काळ १० हजार कोटींची मदत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली होती. जाहीर करण्यात आलेली मदत ही तुटपुंजी असल्याची टिका राष्ट्रवादी कॉंग्रेसने केली होती. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी २५ हजार कोटी रुपयांची मदत देण्याची मागणी केली होती.