शरद पवार यांचा विधानसभेत गौरव

0

मुंबई । राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी 50 वर्ष देशाला दिशा देण्याचे काम केले असून त्यांचा राजकीय प्रवास आणि सर्व समस्यांवर उपाययोजना करण्याची दृष्टी अफाट होती, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत काढले. राज्याच्या विकासाची दिशा ठरविण्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महत्वपुर्ण भूमिका बजावली असून त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आणि मार्गदर्शनाचा फायदा नेहमीच महाराष्ट्र व देशाला झाला असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

सर्वांगीण विकासात योगदान
विद्यार्थी चळवळीच्या माध्यमातून राजकारणात सक्रीय होत वयाच्या 27 व्या वर्षी आमदार तर वयाच्या 38 व्या वर्षी राज्याचा मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांनी मिळवला. महाराष्ट्राच्या व देशाच्या सर्वांगिण विकासात त्यांचे योगदान महत्वपूर्ण ठरले आहे.
– राधाकृष्ण विखे-पाटील

संकटाला भिडण्याची ताकद दिली
शपथ न घेणारे लोकांचे पंतप्रधान म्हणून पवार साहेबांची गणना होतेय. महाराष्टाच्या राजकारणाचा इतिहास लिहायचा झाला तर शरद पवार राजकारणात येण्याच्या आधीचं राजकारण आणि आल्यानंतरचे राजकारण असं स्वरूप असेल संकटाला कसं भिडायचं हे पवारसाहेबांकडून शिकायला पाहिजे.
– जयंत पाटील

बाळासाहेब-पवारसाहेब मैत्री अतूट
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व शरद पवार साहेब यांच्यातील मैत्री ही सर्वांनाच ज्ञात आहे. परंतु या मैत्रीच्या आड राजकारण या नेत्यांनी कधी आणले नाही. राजकारणापलिकडे जाऊन विरोधी पक्षाच्या नेत्यांवर विश्वास दाखविण्याचे व त्यांना सन्मान देण्याचे काम पवार साहेबांनी केल्यानेच त्यांचे सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांचे चांगले संबध असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले.
– एकनाथ शिंदे