शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल करणार – आमदार गोटे

0

धुळे । शहराचे आमदार गोटे व राष्ट्रवादीचे नगरसेवक मनोज मोरे यांच्या शुक्रवारी झालेल्या संयुक्त पत्रकार परिषेदेत तेलगी मुद्रांक घोटाळा प्रकरणात शरद पवार दोषी असल्याचे तेलगीच्या नार्को टेस्टवरून सिद्ध झाल्याचे पुरावे आमदार अनिल गोटे यांनी दिले. त्यावर मनोज मोरे यांनी म्हटले की, जर तेलगी प्रकरणात शरद पवार दोषी असतील तर आपण त्यांच्यावर गुन्हा का दाखल केला नाही, कारण या देशाशी कोणीही गद्दारी करत असेल तो कोणताही पक्षाचा असो तो अतिरेकी आहे, म्हणून त्यावर कारवाई झाली पाहिजे, असे मत मोरे यांनी व्यक्त केल्यावर आमदार अनिल गोटे यांनी सांगितले की, मी आपले आव्हान स्वीकारून शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल करेन. आतापर्यंत न करण्याचे कारण राम जेटमलानी यांनी मला अडवले होते, त्यावेळी जेठमलानी यांनी मला सांगितले की, जो हुवा ऊसे भूल जावो दुष्मनी मत करो म्हणून मी थांबलो असल्याचे सांगितले.