शरद पवार, राज ठाकरे आज धुळ्यात

0

धुळे प्रतिनिधी । राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन्ही नेते आज धुळ्यात येत आहेत.

शरद पवार यांच्याहस्ते धुळे महापालिकेच्या नव्या इमारतीचा उदघाटन सोहळा होत आहे तर शाहू महाराज नाट्यगृहात राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेचा उत्तर महाराष्ट्रस्तरीय कार्यकर्ता मेळावा होत आहे. ठाकरे यांच्यासमवेत उत्तर महाराष्ट्रासह राज्यस्तरावरील अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. दोन्ही मान्यवरांचा कार्यक्रम सकाळी ११ वाजता होणार आहे. यामुळे दोन्ही नेते नेमके काय बोलतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.