शरद भोंगाडे यांची बिनविरोध निवड

0

तळेगाव दाभाडे:- श्री. डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी शरद बबनराव भोंगाडे यांची तर उपाध्यक्षपदी राहुल पंढरीनाथ पारगे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. यावेळी संस्थेचे संस्थापक, पुणे पिपल्स बँकेचे अध्यक्ष बबनराव भेगडे, मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बबनराव भोंगाडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखाना संचालक अंकुश आंबेकर सह संस्थेचे संचालक उपस्थित होते.

संस्थेची वार्षिक उलाढाल 40 कोटीची असून ठेवी 9 कोटी पन्नास लाख आहेत. संस्थेला 26 वर्ष पूर्ण झाली असून संस्था सर्वसमावेशक काम करते असे नगरसेवक संतोष भेगडे यांनी यावेळी मत व्यक्त केले.यावेळी बबनराव भेगडे यांनी संस्था महिला सक्षमकिरणासाठी प्रथम प्रधान्य देते. संस्था मावळ तालुक्यात अग्रगण्य, स्वयरोजगार निर्मिती महिला बचत गटांना कर्ज वाटप इत्यादी बाबतीत पुढाकार घेऊन काम करत असून नवनिर्वाचीत पदाधिका-यांना शुभेच्छा व्यक्त केल्या.

नवनिर्वाचीत पदाधिकारी पुढीलप्रमाणे
अध्यक्ष- शरद भोंगाडे, उपाध्यक्ष- राहुल पारगे, सचिव- सतीश भेगडे, खजिनदार- निलेश राक्षे , संचालक- उर्मिला भेगडे,सल्लागार- विलासराव भेगडे यांची निवड झाली.