शरिरसौष्ठव स्पर्धेत जिल्हा संघ चॅम्पियन

0

जळगाव । नुकत्याच अहमदनगर येथे झालेल्या उत्तर महाराष्ट्रस्तरीय पाच जिल्ह्यांच्या विभागीय शरीरसौष्ठव स्पर्धेत खेळाडू सर्वेश साहू याने मानाचा श्री चा किताब व मोस्ट इम्प्रुव्हडच्या किताबासह चार वजनी गटात प्रथम क्रमांक मिळवून टीम चॅम्पियनशिपचा किताब मिळविला. साहू याने 80 किलो वरील वजनी गटात प्रथम क्रमांक मिळवत गोल्डमेडल मिळविले व रोख रु. 11111/- तसेच कायमस्वरुपी मोठा करंडक श्री चा पट्टा मिळविला. मोस्ट इम्प्रुव्हड किताबसुध्दा जळगावचा सुरज बोंबीले याने मिळविला प्रथम गटात जळगावचा धिरज जाधव याने गोल्डमेडल मिळविले. याच गटात जळगावचा कुलजितसिंग याने सिल्व्हर मेडल मिळविले.

तसेच सागर कदम याने गटात चौथा क्रमांक मिळवून गटात जळगावचे वर्चस्व सिध्द केले. दुसर्‍या गटात जळगावच्या सुरज बोंबीलेने गोल्डमेडल मिळविले. तर रोशन रोडे याने सिल्व्हर मेडल मिळविले. पुढील गटात जळगावच्या पवनकुमारने गोल्डमेडल मिळविले तर मोहसीन शेख याने सिल्व्हर मेडल मिळविले. त्यापुढील गटात चित्तरंजन कुमार याने गोल्डमेडल मिळविले. तर सुरज शाहू याने सिल्व्हर मेडल मिळविले. जिल्हा संघाने 113 गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला. टीम चॅम्पियनशिपचा किताब व करंडक टीम मॅनेजर दीपक हातोले व मोनीश सपकाळे यांनी स्विकारला. शरीरसौष्ठव खेळाडंचा भव्य जाहीर नागरी सत्कार बुधवार 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजता श्री साई बजरंग जिम 93, एकवीरा भुवन, राधाकृष्णनगर, शिवाजीनगर येथे करण्यात येणार आहे.