शशांक मनोहर यांचा आयसीसीच्या चेअरमनपदाचा राजीनामा

0

दुबई । आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) अध्यक्ष शशांक मनोहर आठ महिन्यांपूर्वीच मनोहर यांनी आयसीसीच्या चेअरमनचा कार्यभार स्वीकारला होता. मे 2016 रोजी मनोहर यांची आयसीसीच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली होती.आयसीसीच्या अध्यक्षपदा तडकाफडकी राजीनामा दिला असून यामागे वैयक्तिक कारण असल्याची सांगितले जात आहे.एएनआयने याबाबतची माहिती ट्विटरवर दिली आहे. शंशाक मनोहर यांनी आयसीसीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून यामागे वैयक्तिक कारण असल्याचे सांगितले आहे.

मे 2016 साली शशांक मनोहर यांची आयसीसीच्या अध्यक्षपदावर बिनविरोध निवड झाली होती.बीसीसीआयचे अध्यक्षपद सोडून मनोहर यांची आयसीसीच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. मनोहर यांनी गेल्या वर्षभरात लोकप्रिय घोषणा केल्या नसल्या तरी क्रिकेटमध्ये महत्त्वपूर्ण बदल आणण्यासाठी काही ठोस भूमिका त्यांनी मांडल्या होत्या. मनोहर यांच्या भूमिकांना आयसीसीमध्ये विरोध झाल्याचे सांगण्यात येत आहे.

आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्ह रिचर्डसन यांना मनोहर यांनी आपले राजीनामा पत्र पाठविले आहे.त्यात ते म्हणतात, ”गेल्या वर्षी माझी आयसीसीच्या चेअरमनपदी एकमताने निवड झाली होती. मी आयसीसीचा पहिला स्वतंत्र चेअरमन बनलो. समितीच्या प्रत्येक निर्णयात आपले सर्वश्रेष्ठ योगदान देण्याचा आणि निष्पक्षपातीपणे काम करण्याचा मी प्रयत्न केला. मात्र आता वैयक्तिक कारणांमुळे या पदावर राहणे मला शक्य होणार नाही. त्यामुळे मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे. कर्तव्यकठोर प्रशासक अशी ओळख असलेल्या मनोहर यांनी दोन वेळा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्षपद भूषवले होते. 25 सप्टेंबर 2008 ते 19 सप्टेंबर 2011 दरम्यान मनोहर यांनी पहिल्यांदा बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषवले होते. त्यानंतर 2015 साली जगमोहन दालमिया यांचे निधन झाल्यानंतर पुन्हा एकदा शशांक मनोहर यांच्याकडे बीसीसीआयचे अध्यक्षपद सोपवण्यात आले होते.