शस्त्रक्रिया अभियान म्हणजे आरोग्याची नांदी!

0

जळगाव। डॉ उल्हास पाटील वैद्यकिय रूग्णालयाचे मोफत शस्त्रक्रिया अभियानातून जिल्हयात आरोग्यांची नांदी सूरू झाल्याचे उदगार पाचोरा येथील रूग्ण उमेश महाजन यांनी काढले. उमेश महाजन यांना हदयविकाराचा त्रास जाणवू लागल्यानंतर एन्जीओग्राफीसाठी येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात आणले असतांना दोन मुख्य रक्तवाहीन्यामध्ये 98 टक्के अडथळे असल्याचे लक्षात आले. त्यांच्यावर ताबडतोब एन्जीओप्लास्टी करणे गरजेचे असल्यामूळे महात्मा फुले जनआरोग्य योजनेत कागदपत्राची वेळ न पाहता उपचार करण्यात आले. रूग्णालय प्रशासन व कर्मचा-यांनी त्यांना केलेल्या सहकार्यामूळेच जिव वाचला. अशी सेवा व असे अभियानामूळे जिल्हयात आरोग्यांची नांदी सूरू झाली असल्याचे उदगार त्यांनी यावेळी काढले.

बालकांसाठी शिबीर
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाच्या या महाशिबीरात लहान बालकांसाठीही मोफत तपासणी शिबीर घेण्यात येणार आहे. ज्या लहान बालकांना रक्ताचे आजार, श्वासोच्छवासाचे आजार, नवजात न्युमोनिया, दमा, जन्मजात हृदयाचे आजार, कमी वजनाचे बालक यांच्या सर्व प्रकारच्या समस्यांबाबत तज्ञांकडून उपचार केले जाणार आहेत.