शस्त्रक्रियेसाठी पंतप्रधानांच्या निधीतून 50 हजारांची मदत

0

शिरपूर। शहरातील रहिवासी वसंत शामराव माळी यांना हीप हाडाचा शस्त्रकियेसाठी तीन लाख रुपयाचा खर्च लागणार आहे. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सहायता निधीतून पन्नास हजार रूपयांची मदत मिळाली असून खासदार डॉ.हिना गावीत यांचा शिफारसीने व भाजपाचे धुळे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, जिल्हा सरचिटणीस अरूण धोबी यांच्या पाठपुराव्याने पन्नास हजार रुपयाची मदत मिळाली आहे. शस्त्रक्रीयेसाठी आवश्यक मदतीचे पैसे जे.जे हॉस्पिटल येथे पैसे जमा झाल्याचे पत्र देण्यात आले आहे. भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांचे हस्ते वसंत माळी यांना 24 ऑगस्ट रोजी पत्र देण्यात आले.

यांची होती उपस्थिती
यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस अरूण धोबी, जिल्हा चिटणीस संजय आसापूरे, चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष हेमंत पाटील भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हा सरचिटणीस मुबीन शेख, शहर उपाध्यक्ष प्रशांत चौधरी, शहर चिटणीस राधेश्याम भोई, अविनाश शिंपी, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सुनिल माळी, भटक्या विमुक्त आघाडी शहराध्यक्ष रविंद्र भोई, व्यापारी आघाडी शहराध्यक्ष नंदू माळी, राजाराम पाटील आदी उपस्थित होते. वसंत माळी यांचावर शस्त्रकियेसाठी पन्नास हजार रूपयाची मदत अरूण धोबी यांनी मिळवून दिल्याबद्दल माळी कुटुंबियानी समाधान व्यक्त केले आहे.