भुसावळ| आर्म अॅक्टच्या गुन्ह्यात एक वर्षांपासून पसार असलेल्या आरोपीच्या बाजारपेठ पोलिसांनी मुसक्या आवळल्या. जितेेंद्र उर्फ पापा मोहन बारसे (30, रा.वाल्मीक नगर, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीविरुद्ध बाजारपेठ पोलिसात भाग सहा, गुरनं.3098/2016, आर्म अॅक्ट 4/25 अन्वये गुन्हा दाखल होता. संशयीत आरोपी घरी आल्याची माहिती बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांना मिळाल्यानंतर सहाय्यक फौजदार आनंदसिग पाटील, कॉन्स्टेबल विकास सातदिवे, दिनेश कापडने यांनी सापळा रचत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. तपास हवालदार मोहमदअली सैय्यद करीत आहेत.