शहरबंदी व हद्दपारी आदेशाचे उल्लंघण : भुसावळात दोघांना अटक

0

भुसावळ- प्रांताधिकार्‍यांनी चौघा उपद्रवींना हद्दपार तर गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या 47 जणांना उत्सव काळात शहरात येण्यास बंदी केली होती मात्र प्रांताधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लंघण करीत शहरात सर्रास वावरणार्‍या अक्षय प्रकाश न्हावकर (20, रा.गायत्री मंदिर जवळ) यासह शेख चाँद शेख हमीद अटक करण्यात आली. आरोपीविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. शेख चाँद यास दोन वर्षांपासाठी हद्दपार करण्यात आले असून कारवाईनंतरही तो गावात असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यास गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. आरोपीविरुद्ध रवींद्र पाटील यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, पोलिस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अंबादास पाथरवट, तस्लिम पठाण, सुनील थोरात, कृष्णा देशमुख, विकास सातदिवे आदींच्या पथकाने केली.