शहरभर पर्यावरणाचा जागर!

0

पिंपरी-चिंचवड : पर्यावरणप्रेमी नागरिक, संस्था, संघटना यांनी मंगळवारी पर्यावरण दिनानिमित्त आपापल्या परीने पर्यावरणास हातभार लावला. यात कोणी आपल्या दारात, डोंगरावर, कंपन्यांच्या आवारात वृक्षारोपण केलेच, शिवाय जलपर्णीचा वेढा बसलेल्या पवना नदीची स्वच्छता केली. तसेच कोणताही गाजावाजा न करता स्वत:हून दररोज पर्यावणाची जपणूक करणार्‍या व्यक्तिंचाही काही ठिकाणी सत्काराचे कार्यक्रम झाले. नागरिकांनी पर्यावरण रक्षणाची शपथ घेतलीच, शिवाय दरवर्षी ‘एक झाड लावू आणि ते जगवू’ असा संकल्पही केला गेला. या सार्‍या उपक्रमात आबालवृद्धांनी उत्स्फूर्त सहभागी होवून शहरभर पर्यावरणाचा जागर मांडला गेला.

1. पर्यावरण प्रेमींचा निमित्त सन्मान
निगडी : पर्यावरण संवर्धन समिती (इसिए) तर्फे निगडी प्राधिकरण मध्ये प्लास्टिक कचरा व्यवस्थापन आणि प्लास्टिक वापर बंदी बाबत शहरातील 100 पेक्षा जास्त नागरिकानी प्रभात फेरी काढली. तसेच अनेक पर्यावरण जनजागरण बाबत घोषणा दिल्या. यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते पर्यावरण रक्षकांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये महापालिकेतील गटार कुली संजय भोसले व सचिन खरात, शहरातील रस्त्याकडील झाडांना वर्षभर पाणी व संगोपन करणारे कामोद नेरकर, संतोष जाधव, बाळू गटकर, पर्यावरण पूरक रूढी व परंपरा वाढाव्या यासाठी कार्यरत असलेले सुरक्षा विभाग कर्मचारी अरुण घाडगे यांचा सन्मान करण्यात आला.

यांची होती उपस्थिती
IICMR institute च्या आवारात 9 वृक्षांचे रोपण करण्यात आले. त्यासाठी आयुक्त हर्डीकर, नगरसेविका अनुराधा गोरखे, शर्मिला बाबर, नगरसेवक अमित गावडे, सहायक आयुक्त मंगेश चितळे, आरोग्याधिकारी मनोज लोणकर, खखउचठ ळपीींर्ळीीींंश संस्थापक मनोहर जांभेकर, इसिए अध्यक्ष विकास पाटील, IICMR institute चे संचालक अभय कुलकर्णी, इसिएचे विश्‍वस्त पुरुषोत्तम पिंपळे, हिरामण भुजबळ, शामसुंदर परदेशी, चंद्रकांत कुलकर्णी, सुषमा पाटील, अनघा दिवाकर, मीनाक्षी मेरुकर, अनिल दिवाकर, अरुण पाटोळे, दत्तात्रेय कुमठेकर, प्रा. बा. द. बोवा, सिंकंदर घोडके, रमेश सरदेसाई, माधव पाटील, अशोक कसाब, सुर्यकांत मुथीयान आदी उपस्थित होते. शहरातील जेष्ठ नागरिक संघ आणि हास्य क्लबचे सदस्य, विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.