शहरवासी झाले समस्यांनी त्रस्त

0

मुक्ताईनगर। शहरामध्ये विविध समस्यांनी तोंडवर काढले असुन त्या समस्यांकडे लक्ष देण्यास ग्रामपंचायतीला वेळच नाही शहरामधील तु.ल. कोळंबे शाळेजवळ माजीमंत्री एकनाथराव खडसे यांच्या आमदार निधीतुन बसविण्यात आला होता. हायमस्टलॅम्प बसविल्यानंतर टेस्टिंग पुरता चालु करण्यात आला होता त्यानंतर तो गेली 4 ते 5 वर्षांपासुन बंद अवस्थेत आहे. तो लॅम्प बघुन कधी चालु होणार की शोपीस म्हणुन राहणार की काय अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे. तसेच प्रर्वतन चौकापासुन ते कोथळी पर्यंतची स्ट्रीट लाईट काही दिवस चालु होती त्यानंतर ते बंद पडले. यावर्षी चौदाव्या वित्त आयोगातुन एलईडी लाईट बसविण्यात आले होते ते सुध्दा काही बंद काही चालु स्थितीत आहे. काही वर्षापुर्वी भरपुर पाऊस पडल्यामुळे रस्त्यावर पाणी साचलेले होते ते पाणी काढण्याकरीता जेसीबीच्या मदतीने गटारीवरील ढापे हे काही ठीकाणावरील काढण्यात आले होते. परंतु गटारीवरील ढापे बसविण्यात आले नाही. त्यामुळे गटारीमध्ये माती, घाण पडुन गटारी भरल्या आहेत.

गटारींची साफसफाई होईना
आता तर पावसाळा सूरु होणार आहे जर गटारीची साफसफाई झाली नाहीतर गटारी मधील पाणी हे रस्त्यावर तलावाचे स्वरुप आल्या शिवाय राहणार नाही ती परीस्थीती वार्ड 1 मधील शिव कॉलनी, श्री कॉलनी, तहसिलरोड, ग्राम पंचायतीच्या मागील भागामध्ये कन्या माध्यमिक शाळेजवळ गटार ही टुडूंबं भरुन शाळेच्या परिसरात पाणी जात आहे इतर ठिकाणी गटार साफसफाईला कर्मचारी येतच नाही त्यांच्यामुळे नागरीकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे डासांची उत्पत्ती वाढत आहे. तसेच कचराकुंड्या नसल्याकारणाने नागरीकांना कचरा टाकण्याकरीता रिकाम्या प्लॉटचा वापर करावा लागतो. नागरीकांमध्ये ग्रामपंचायत विरुध्द नाराजीचा सुर उमटत आहे. पण काम आत्तापर्यंत फक्त धनगर वाड्याचा रस्ता वगळता कोणत्याही रस्त्याचे झालेले नाही.

आमच्या कॉलनीमध्ये आठवड्याला साफसफाई करीता ग्रामपंचायतीने कर्मचारी नियमित पाठवावे व दोन्ही कॉलनी मधील गटारीमधील घान काढुन पाण्याचा निचरा सुरळीत करावा.

 अमोल काटे

ग्रामपंचायत प्रशासनाने कचरा कुंड्या ठेवून व्यवस्था करावी व साचलेला कचरा वेळोवेळी उचलुन नेऊन त्याची योग्यरित्या विल्हेवाट लावण्याची आवश्यकता आहे.
निलेश शिरसाठ

आमच्या दुकानासमोर गटारीतील घाण पाणी साचत असल्याने आमच्या दुकानात गिर्‍हाईकांना येण्यास सि होत असल्याने ग्रामपंचायतीने लवकरात लवकर गटार साफ करावे.
संजय फरदळे

गटारींमध्ये कचरा तुंबला
तसेच शहरातील वॉर्ड क्रमांक 4 व 5 मध्ये ही गटारीची समस्या आहे. याठिकाणी गटारी तुंबल्या आहेत. या वार्डामध्ये नागरीकांना कचरा 5 दिवसांचा घरामध्ये जमा करावा लागतो. या वॉर्डामधील नागरिकांचा रोष निर्माण झाला आहे अशीच जर परीस्थिती राहीली तर येणार्‍या पावसाळ्यामध्ये गॅसट्रोची, डायरीयाची लागण झाल्याशिवाय राहणार नाही. तसेच प्रवर्तन चौकामधील बस डेपोला लागुन असलेले लहान व्यापार्‍यांना सुध्दा गटार चोकप असल्यामुळे गटारीच्या दुर्गंधीचा सामना करावा लागतो.