जळगाव । अमृत योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यांतील भूमीगत गटारींची निविदा प्रक्रीयापूर्ण होऊन जैन इरिगेशन कंपनीला ठेका देण्यात आला होता. हा ठेका रद्द करून जैन इरिगेशनला कंपनीला कार्यदेश न देता रिटेडंरींग करण्याच्या सूचना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून मिळाले असल्याची माहिती महापौर ललित कोल्हे यांनी दिली आहे. याप्रसंगी माजी स्थायी सभापती तथा नगरसेवक नितीन बरडे, अनंत जोशी उपस्थित होते. महापौर कोल्हे यांनी यावेळी सांगितले की, पालकंमंत्री शहराकडे लक्ष देत नसल्यानेच हा ठेका रद्द झाला आहे. पालकमंत्र्यांनी लक्ष दिले असते तर भूमीगत गटारींच्या पहिल्या टप्प्यांतील 131 कोटी रूपयांचा प्रस्ताव रद्द नसता. याघटनेतून पालकमंत्र्याचे शहराकडे लक्ष नसल्याचे यातून दिसत आहे. शहरातील जनतेचा यात काय दोष आहे असा प्रश्न महापौर कोल्हे यांनी उपस्थित केला.
भाजपा नगरसेवकांनी आरोप सिद्ध करून दाखवावा
महापौर कोल्हे यांनी भाजपा नगरसेवकांनी केलेल्या आरोपांना उत्तर देतांना सांगितले की, महापौरांना वाढीव भागात गटारींचे कामे केली आहेत. ही सर्व कामे त्यांना विश्वासात घेवून केली असल्याचा दावा करत या कामांवर आमदारांच्या सह्या असल्याचे महापौर कोल्हे यांनी स्पष्ट केले. भाजपा नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे, ज्योती चव्हाण यांच्या वार्डांमध्ये नगरोत्थान योजनेतून कामे केली आहेत. त्यांचे आपसात पटत नाही असे सांगितले. भाजपा नगरसेवकांनी भूमाफीयांकडून ले आऊटमध्ये फायदा घेतला होता असे सिध्द करावे असे आवाहन महापौर कोल्हे यांनी दिले. 25 कोटींच्या निधीतून केवळ 1.5 कोटींची कामे ही पोल टाकण्यासाठी वापरण्यात येणार आहेत असे स्पष्ट केले. आता 25 कोटींचा चेंडू त्यांच्या कोर्टात असल्याचे महापौर कोल्हे यांनी सांगितले.
वेगवेगळ्या कारणांनी मानधन काढून घेतले
भाजपा नगरसेवक अनिल देशमुख यांनी सभागृहात केलेल्या कृत्याचे व्हीडीओ रेकॉर्डींग तपासून कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले. अनिल देशमुख यांनी स्मशानभूमीच्या लाकडांसाठी दिलेले मानधन स्वतःच्या खात्यांत वळवून घेतले. भाजपाच्या अर्धापेक्षा अधिक नगरसेवकांनी वेगवेगळी कारणे देवून त्यांचे मानधन काढून घेतले असल्याचे सांगितले.
निवडणूक स्टंट असल्याचा आरोप
भाजपा नगरसेवक रविंद्र पाटील यांना प्रत्येक वेळी दिड तास वेळा दिला आहे. नगररचना विभागातील फाईल ह्या क्लीअर केल्याने यात आम्ही काय चुक केली आहे काय ? असा सवाल महापौरांना विचारला आहे. विरोधकांकडून हा निवडणूक स्टंट असल्याचेही महापौर कोल्हे यांनी सांगितले.
सर्व नगरसेकांना समान न्याय
ललित कोल्हे महापौरपदावर गेल्या सात महिन्यांपासून आहेत. याकाळात त्यांनी कोणताही भेदभाव न करता शहरात कामे केली असल्याचा दावा केला आहे. भाजपा नगरसेवक सर्व सामान्य जनतेचा प्रश्न सभागृहात मांडत नाहीत. भाजपाच्या ज्या नगरसेविका बियरबारला विरोध करतात, त्या त्यांच्याघरासमोरील वाईन शॉपला का विरोध करीत नाहीत असा प्रश्न उपस्थित केला. आगामी निवडणुकीत भाजपाने केलेला 50 प्लसचा दावा खोटा ठरून त्रांची संख्रा 15 मारनस होणार असल्राचेही रावेळी त्रांनी सांगितले.