नवी दिल्ली – शहरांच्या नामांतर मुद्यावरुन भाजपला विरोधीपक्ष चांगलेच धारेवर धरत आहे. उत्तर प्रदेशनंतर आता हैदराबादच्या नामांतरचा मुद्दा चर्चेत आहे. तेलंगणामध्येभाजपा सत्तेत आली तर हैदराबाद व अन्य शहरांची नावं बदलून थोर व्यक्तींची नावं देण्यात येतील, असे विधान भाजपा नेते राजा सिंग यांनी दिले आहे. यावरुन काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी यांनी डायलॉगबाजी केल्यानं जनतेची मतं मिळतील, असे वाटतंय. हैदराबादी असल्याचं आम्ही गर्वानं सांगतो. हे कोण आहेत नामांतर करणारे. स्वतःचं नाव बदला. शहराचं नाव, आमची ओळख, हे सर्व बदलण्याचा प्रयत्न करतील ना तर सिंगजी यांच्यासमोर खूप अडचणी निर्माण होतील, अशा शब्दांत इशारा दिला आहे.