जळगाव । शहरात काँग्रेस पक्षाचे चांगले काम सुरू असून भावी आमदारपदाचे उमेदवार हे डॉ. राधेश्याम चौधरी हे राहतील असे प्रदेशउपाध्यक्ष तथा उत्तर महाराष्ट्र ओबीसी समिती अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांनी स्पष्ट केले. ते काँग्रेसतर्फे आयोजित ओबीसी पक्ष कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. याप्रसंगी ओबीसी विभागाचे समन्वयक प्रा. प्रकाश सोनवणे, ओबीसी विभागाचे उत्तर महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सदस्य माजी आमदार शिरीष चौधरी, मधुकर साखर कारखाना चेअरमन तथा सदस्य शरद चौधरी, जिल्हा महिला काँग्रेस कमिटी अध्यक्षा सुलोचना वाघ, शहरकार्याध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष अशोक कलाले माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, जिल्हासरचिटणीस अजबराव पाटील, श्री. खाचणे, प्रा. संजय पाटील, देवेंद्र मराठे, अल्पसंख्याक कमिटी अध्यक्ष अमजद पठाण, ज्ञानेश्वर सोनवणे आदी उपस्थित होते.
काँगे्रसच्या चुका झाल्याचे केले मान्य
खा. डॉ. पाटील यांनी मागील काळात काँग्रेसच्या चुका झाल्या असल्याचे मान्य करत यापुढे सर्वांना सोबत घेऊनच कार्य केले जाईल अशी ग्वाही दिली. मेळाव्याचे उद्दिष्ट सांगतांना डॉ. पाटील यांनी सांगितले की, जिल्ह्यातील ओबीसी नेत्यांच्या यादी तयार करणे, चर्चा करणे, तसेच जिल्हा काँगे्रस कार्यकारणीसोबतच ओबीसी विभागाची स्वंतत्र कार्यकारणी तयार करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. या ओबीसी विभागातर्फे जिल्हा काँगे्रसला बळ देण्याचे काम करण्यात येईल अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली. शेतकर्याना ऑनलाईनमध्ये गुंतागुंत केली. लाखो शेतकर्यांचे फॉर्म भरून घेतले, परंतु प्रत्यक्षात 20-25 शेतकर्यांचा लाभ झाला असल्याचा आरोप खा. डॉ. पाटील यांनी केला.
ओबीसीसोंबत मराठा समाजाला न्याय
डॉ. पाटील यांनी भारतीय राज्यघटनेनुसार ध्येयधोरणांची अंमलबजावणी काँगे्रसने केली आहे. राजीव गांधी यांच्या काळापर्यंत ओबीसी समजाला काँग्रेसमध्ये प्राधन्य देण्यात आले होते. परंतु, मधल्या काळात काँग्रसेने ओबीसी समजाकडे दुर्लक्ष केल्याने त्यांना सत्तेबाहेर रहावे लागले असल्याचे डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले. ही चुक दुरूस्त करण्यासाठी यापुढे काँग्रेसच्या तिकीट वाटप कमेटीत 50 टक्के ओबीसींचा सहभाग राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. ओबीसींसोबतच मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न काँगे्रसतर्फे करण्यात येत असल्याचे खा. डॉ. पाटील यांनी सांगितले.
ओबीसींना एकत्र आणणार
ओबीसी समाजातील कार्यकर्त्यांसोबत हितगुज करण्यासाठी तसेच कार्यकर्त्यांची पक्षाबाबत असलेल्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रतिपादन समन्वयक प्रा. प्रकाश सोनवणे यांनी केले. ओबीसी समाज बांधवांच्या प्रत्येक जिल्ह्यात बैठका घेण्याचे आदेश प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या सूचनेनुसार दिले आहेत. यानुसार उत्तर महाराष्ट्रातील पहिला ओबीसी मेळावा जळगाव जिल्ह्यात आयोजित करण्यात आला असल्याची माहिती प्रा. सोनवणे यांनी दिली. देशात ओबीसींच्या 350 जातीअसून त्यांना यामाध्यमातून एकत्र करण्यात येणार असल्याचेही प्रा. सोनवणे यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्याचा व्यक्तव्याचा निषेध
मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाभिक समाजाविरोधात गरळ ओकली असून नाभिक समाजाचा अपमान केल्याने त्यांचा जाहीर निषेध करीत असल्याचे सांगितले. शेतकर्यांसाठी कर्जमाफीची घोषणा फडणवीस सरकारने केली परंतु प्रत्यक्षात दिली नाही. तसेच त्यांच्या पक्षाचा अध्यक्ष शेतकर्यांना साले शेतकरी म्हणतो यातून त्यांचा व्देष दिसत असल्याचेही प्रा. सोनवणे स्पष्ट केले. ओबीसी समाज 52 टक्के असून तो विविध संघटनांमध्ये विखुरला गेला आहे. त्यांना एकत्र एका छताखाली आणवयाचे असल्याचे प्रा. सोनवणे यांनी सांगितले. यानंतर शहरकार्याध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, श्री. खलाणे, अल्पसंख्याक शहराध्यक्ष अमजद पठाण, स्वामी रेणापुरकर, प्रा. संजय पाटील, माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.