रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीतर्फे पवना नदी स्वच्छता मोहिम
रावेत : हिवाळ्यात नदी पूर्ण जलपर्णीने आच्छादलेली पाहण्याची सवय असणार्या नागरिकांना यंदा मात्र पवनामाईचे स्वच्छ व सुंदर रुप पहायला मिळाले. रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी यांच्या पवनामाई उगम ते संगम नदी स्वच्छता अभियानामुळे पवना नदीचे स्वच्छ व सुंदर चित्र नागरिकांना पहायला मिळत आहे. शहराचे सौन्दर्य टिकविण्याची जबाबदारी पालिकेसह सर्व नागरिकांची सुद्धा आहे, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड शहराच्या स्वच्छता दूत अंजली भागवत यांनी केले.
अभियानाचा 92 वा दिवस
यावेळी रोटरी क्लब चे अध्यक्ष प्रदीप वाल्हेकर, देश का सच्चा हिरो चंद्रकांत कुलकर्णी, मनपा सहायक आयुक्त दिलीप गावडे, संदीप खोत, नगरसेविका करुणा चिंचवडे, अमित गोरखे, शेखर चिंचवडे,हेमंत गवंडे, सोमनाथ म्हसगुडे,अनिल नेवाले आदी उपस्थित होते.रावेत घाटावर आज (रविवारी) सकाळी नऊ ते बारा या वेळेत पवना स्वच्छता अभियान राबविण्यात आले. हा अभियानाचा 92 वा दिवस होता. यावेळी 5 ट्रक जलपर्णी काढून टाकण्यात आली. आज अखेर 500 च्या वर ट्रक जलपर्णी काढून टाकण्यात आली.
विविध संघटनांचा सहभाग
संस्कार प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, शेखर चिंचवडे युथ फाउंडेशन, पीसीसीएफ, लेवा पाटीदार समाजाच्या महिला, रानजाई प्रकल्प,सावरकर मित्र मंडळ आजच्या उपक्रमात सामील झाले तसेच रोटरीचे सर्व सदस्य सामिल झाले होते. अभियानाच्या शेवटाकडे जाताना जास्तीत जास्त लोकांनी यांच्यामध्ये सहभागी व्हावं. नदी स्वच्छतेच काम केवळ रविवारी नाही तर दररोज काही कामगार जलपर्णी काढण्याचे काम करत आहेत. तर दर रविवारी आवर्जून आम्ही लोकही नदी काठावर जमतात. मुळा मुठा नदी सांगवी येथे ही जलपर्णीने पूर्ण भरलेली आहे.
यांनी केले श्रमदान
पिं.चि मनपाचे सहायक आयुक्त दिलीप गावडे व ब प्रभाग सहायक आयुक्त संदीप खोत व देश का सच्चा हिरो असे मोदिजींनी गौरविलेले चंद्रकात राधाबाई दामोदर कुलकर्णी, नोवेल इंस्टीट्युटचे अमित गोरखे, ग्रीनोवेशनचे हेमंत गवंडे, जालबिरादरीचे नरेन्द्रभाई चुग, नगरसेविका करुना चिंचवडे,शेखर चिंचवडे आदी उपस्थित होते. रोटरी क्लबचे अध्यक्ष रो.प्रदीप वाल्हेकर, सेक्रेटरी रो.दीपक वाल्हेकर, प्रोजेक्ट डायरेक्टर रो.मयूर वाल्हेकर, सी.एस.आर.डायरेक्टर जगन्नाथ फडतरे ,फंड रेझिंग डायरेक्टर रो.सोमनाथ हरपुडे, रो. मारुती उत्तेकर, रो. शेखर चिंचवडे, रो.राजेंद्र चिंचवडे, रो. सचिन काळभोर, रो. गणेश बोरा, रो.सुनिल कवडे, रो. सुनिल वाल्हेकर, रो.चिंतामणी सोंडकर, सुधीर मरळ, रो.वीरेंद्र केळकर, रो.युवराज वाल्हेकर, रो. संदिप वाल्हेकर ,रो अनिल नेवाळे व सर्व रोटरी मेम्बर्स कुटुंबियांसह यात सहभागी झाले. तसेच पीसीसीएफ टीम, इसिए टीम , वृक्षवल्ली , सावरकर मित्र मंडळ, शेखर चिंचवडे युथ फाऊडेशन, एसकेएफ कंपनी एम्पल्योईज, हरिष मोरे मित्र परिवार, संस्कार प्रतीष्टान, लेवा शक्ती सखी मंच आदी संस्थांनी यामध्ये सहभाग नोंदवला.