शहराच्या विकासाकरीता निधीसाठी प्रयत्न करणार – सुनिल काळे
भोगावती नदी , तिरंगा सर्कल व शिव स्मारक सुशोभीकरणाला दिले जाणार प्राधान्य
वरणगांव । प्रतिनिधी
वरणगांव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शासन दरबारी ना गिरीषभाऊ महाजन यांच्या माध्यमातुन पाठपुरावा करून भरघोस निधी आणणार असून यामध्ये शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारक व तिरंगा सर्कलचेही सुशोभीकरण करण्यात येईल . तसेच शहराच्या विकासासाठी आपल्या आशिवार्दाने कटिबद्ध राहणार असल्याचे माजी नगराध्यक्ष सुनिल काळे यांनी सांगितले .
शहरातील भोगावती नदी पात्रालगतच्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नाव नोंदणी झालेल्या कामगारांना साहित्याचे किट वाटप तसेच माजी नगराध्यक्ष सुनिल काळे यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम संपन्न झाला .यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नंदकुमार महाजन, पितांबर भावसार, चंद्रकांत बढे सर, मुस्लीम पंच कमेटीचे अध्यक्ष शेख अल्लाउद्दीन शेठ, म .गां . विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक के.एम . पाटील सर यांचेसह शहरातील मान्यवरांची उपस्थिती होती . प्रसंगी मान्यवरांनी आपाआपले मनोगत व्यक्त करतांना श्री .काळे यांचे समाजपयोगी तसेच शहराच्या विकासासाठी सुरु असलेली धडपड कौतुकास्पद असल्याचे सांगितले. तर यावेळी श्री.सुनिल काळे यांनी ना गिरीष महाजन, खा रक्षाताई खडसे व आ संजय सावकारे यांच्या माध्यमातुन शहरातील विविध विकास कामांना चालना मिळाली असुन शहरातील नागरीकांची लवकरच पाणी टंचाईच्या समस्येतून मुक्ती होणार आहे . तसेच भोगावती नदीपात्राचे सुशोभिकरण तसेच छत्रपती शिवाजी महाराज स्मारक व शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या बसस्थानक चौकातील तिरंगा सर्कलचे सुशोभिकरण करण्यात येईल . तसेच यापुढेही शहराच्या विविध विकास कामांसाठी लागणाऱ्या निधीकरीता मंत्री महोदय व लोकप्रतिनिधीकडे निधीसाठी सतत पाठपुरावा केला जाणार असुन विरोधकांना न जुमानता शहराच्या सर्वांगीण आपल्या आशिवार्दाने कटीबद्ध असल्याचे सांगितले .
*कामगारांची नोंदणी व साहीत्य किट वाटप*
भारतीय जनता पार्टी वरणगांव शहराच्या वतीने गेल्या काही दिवसांपासून कामगार नावे नोंदणी करून त्यांचा शासन दरबारी पाठपुरावा केला . त्यानुसार शासनाच्या महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ तसेच विकास व कल्याण योजनेतंर्गत शहरातील ५०० कामगारांची रितसर नोंदणी झाली . यामुळे नोंदणी झालेल्या कामगारांना शासनाच्या योजनेतुन सुरक्षा किट व इतर साहित्य पेटीचे वाटप सुरु करण्यात आले असून नोंदणीकृत कामगारांना शासनाच्या मधान्ह भोजन योजनेतंर्गत दोन वेळेस भोजन दिले जाणार आहे . तसेच शहरातील किमान दोन हजार कामगारांची नोंदणी केली जाणार असल्याचेही सांगण्यात आले .